आख़ेरचा क्षण

श्वासांची शाश्वति कोणाला देता येते
आयुष्यभर साथ देणा-या ह्र्दयाला तरी ती कुठे सांगता येते..
आता येणारा क्षणही आख़ेरचा क्षण असेल,
माझ्या उरतीलही येथ आठवणी काही..परी माझी साऊलीही नसेल.

एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आह....े



जे कधी न जमले मजला, इतरांना जमले होते...
मज साधे घर नसताना, त्यांचे तर इमले होते !

मी वाट तुझी बघताना, नुसतेच न शिणले डोळे;
प्रत्येक वळण वाटेचे, कंटाळुन दमले होते !

त्या घेराव्यातच मजला, जी झाली धक्काबुक्की..
माझ्यावर ते कुसुमांचे, हारांतुन हमले होते !

तांबडे फुटेतो तू-मी, त्या रात्री जागत असता,
विझण्याचे विसरुन तारे, चमकण्यात रमले होते !

एकांती ऐकू आली, मज बालपणीची गाणी,
पाखरू मनाचे माझ्या, वळचणीस घुमले होते !

होकार घेउनी जेव्हा, आलीस अंगणी माझ्या,
नवसाच्या प्राजक्ताचे, झाडच घमघमले होते !

मी गझल गुणगुणत माझी, रस्त्याने चालत होतो..
आकाश मजपुढे तेव्हा, अदबीने नमले होते !

अजुनहि माझे.....

माझी कविता-हीच माझी आजची ओळख आहे……. तो. त्याच्या वर लिहिणे म्हणजे, शब्दांना नित्य-नवा साज आहे, माझ्या आयुष्याचा तोच महत्वाचा भाग आहे... तुम्हाला सांगण्या सारख तस काहि नाहि, पण बेभान माझ्या आयुष्याला तोच एक लगाम आहे... माझ लिखान हेच माझ आता प्रेम आहे, त्याने दिलेल्या जखमांवरच तेच उरलेला व्रण आहे... बहरलेल्या झाडाला पान गळतीचा तो शाप आहे, माती मधे विरुन गेलेला तो पावसाचा पहिलाच थेंब आहे... माझ्या प्रत्येक दुःखाला तोच जबाबदार आहे, पण तुम्हाला खरे सांगु, अजुनहि माझे त्याच्यावर मनापासुन प्रेम आहे.....



भय इथले संपत नाही

मज तुझी आठवण येते...

मी संध्याकाळी गातो

तू मला शिकविली गीते...

ते झरे चंद्र सजणांचे

ही धरतीभगवी माया

झाडांसी निजलो आपण

झाडात पुन्हा उगवाया...



हळूच ये स्वप्नी माझ्या कधीतरी कातरवेळी
तुझ्या वियोगाच्या उठती कळा उरी कातरवेळी

नकोस रे कालिंदीच्या तटी करू छेडाछेडी
कशी प्रवेशू ओलेती पतीघरी कातरवेळी

नकोस तू पावा छेडू घरापुढे सायंकाळी
थरारते देहामधली निशाचरी कातरवेळी

कधी कटीशी झोंबे ती, कधी दिसे बाहूपाशी
अधर तुझे चुंबी वेणू निलाजरी कातरवेळी

असे उंबऱ्याचे कुंपण, करात या हिरव्या बेड्या
तरी जारकर्माच्या मी शिवेवरी कातरवेळी

कळे तुझ्या छळण्यामधली अवीट मज गोडी तेव्हा
छळे तुझे नसणे जेव्हा परोपरी कातरवेळी

तृषार्त माती गंधाळे, बने मृण्मयी मृद्गंधा
(पडूनिया गेल्या गाली पुन्हा सरी कातरवेळी…)



आमच प्रेम...

आमच्या प्रेमाच्या साक्षिला सुरुच्या बागा होत्या, समुद्राच्या ठिकाणी जाणाऱ्या नागमोडी वाटा होत्या, मंदिरातली अबोल देवाची मुर्ति होती, न पाहीलेलि अशी दुरवर विसावलेली आमची मने होती.,...

खरचं प्रेमात मी खुप काही हरवल आहे, माझं शिक्षण-माझी नोकरी, सुखाचे दिवस सोनेरी, उरली फ़क्त चारोळीच्या रुपातुन मिळणारी शांती. ....


त्याच्या येण्याची आजही मला आस आहे, खर सांगु तुम्हाला त्याची आठवणच खुप खास आहे, त्याच्या निःशब्द रुपाचीच काय बात आहे, त्याच्या समोर आता माझ्या सारख्या हजारोंची रास आहे.




कविता करताना काही शब्द नकळत खाली सांडले,
सांडलेल्य शब्दांना मी फकतं सरळ रांगेत मांडले..

त्यातले दोघे अचानक एकमेकांशी भांडले,
अन जागा बदलून स्वताःची त्यानीच सुंदर यमक साधले !!


हल्ली तुला पाहिल्याशिवाय मला करमतच नाही, डोळ्यांनी बोलल्याशिवाय राहावतच नाही, मन माझे तुझ्याकडे येऊ पाहते आहे, पण रागवले आहे ते माझ्यावर, मी त्याला पाठवतच नाही...




प्रेमात पडणं सोपं असतं पण प्रेम निभवणं कठीण असतं हातात हात घेऊन चालणं सोपं असतं पण तोच हात आयुष्यभर हातात घेऊन पाऊलवाट शोधणं कठीण असतं.....




चारोळ्या तुमच्या आमच्या....

कोणतीही गोष्ट चार ओळीत संपवणे तसे मुशकिल असते, ते जमविण्यातच तर खरे थ्रील असते,
आणि ते जमले तरच तुमच्याकडे खरे जगण्याचे स्कील असते !!